सोंगाड्या लावितो आग, समिधा घरच्याच जाळुनी,
खमंग शेकल्या पोळ्या, तेल आगीत
ओतुनी,
पुशितो स्वतःची पातके, तयांचे रक्त
शिंपडुनी,
आपले कुकर्म इतरांवर, झाला मोकळा मढुनी.
ते चाळीस, हे चारशे, तरीही मुसळ
वाकडे,
आजवर कुणी रोखले, कशाचे होते वावडे,
उगा का करतात वल्गना, लादुनी बकासुराचे
गाडे,
भेदी चोरतो मडकी, प्रजा फुंकती
उकिरडे.
सकल ठेविले गुंडाळून, वेशीवर टांगले
सारे,
कुणी घेतले सोंग, कुणी साखरेत
घोरे,
वाट चुकली लेकरे, होरपळून गेले
सारे,
दलाल पांघरे भरजरी, मातीची विखुरती लकतरे.
*****
# Nation, Revolution