15 June, 2023

• तृष्णा

नांगर थकूनही झाले प्रसन्न, सिद्ध जे होती वावर,
नभास विनवित क्षमा, करिण्या चिंब धरा सत्वर,
ज्येष्ठ वाढवी तृष्णा, क्षण क्षण होतो दुष्कर,
आराधनेत सकळ जीवांच्या, वत्सल घननील पयोधर।
*****