10 July, 2023

• चिंब

कधी टपटप पडती चहुकडे, कधी कमलदलावर अवखळ,
शाखांवर बरसल्या धारा, पानांवर मोदाचे ओघळ,
तृषार्त मातीत झिरपला, चिंब फुलांचा परिमळ,
तोषात भिजला परिसर, नभाची ओथंबली ओंजळ।
(Select lines from my Marathi poetry book)
*****

03 July, 2023

• नवांकुर

तप्त क्षमेची तृष्णा, भिजून जाहली शांत,
अंथरले नवांकुर हिरवे, विसावली पावले क्लांत,
सर्द गारवा रानातला, सावरतो चित्त भ्रांत,
कुंद तृणांच्या स्पर्शाने, सुखावले जीव श्रांत।
*****