विजय तुझा
होणेच होते, तनया तू ‘जयंती’ची,
मायेचा खंबीर आधार,
‘सख्या’ची साथ ही मोलाची,
अनामिकाच राहून उघडलीस,
कवाडे संकीर्ण मनांची,
धन्य तुझ्या लढ्याने,
इंच-इंच न्यायगृहाची।
कणखर तू, संयमी, साहसी,
खाण तू धैर्य जिद्दीची,
साता समुद्रापारही
फडकली, निशाणे अतुल प्रतिभेची,
झुगारले ऐश्वर्य सकळ,
करिण्या सेवा मायभूची,
ललनांची प्रेरणा तू,
अस्मिता अनुपम राष्ट्राची।
■ रुख्माबाई राऊत यांचा वाढदिवस
(Rukhmabai
Raut is best known for being one of the first practicing women doctors in
colonial India as well as being involved in a landmark legal case involving her
marriage as a child bride.)
*****

