22 November, 2017

• रुख्माबाई राऊत

विजय तुझा होणेच होते, तनया तू ‘जयंती’ची,
मायेचा खंबीर आधार, ‘सख्या’ची साथ ही मोलाची,
अनामिकाच राहून उघडलीस, कवाडे संकीर्ण मनांची,
धन्य तुझ्या लढ्याने, इंच-इंच न्यायगृहाची।
कणखर तू, संयमी, साहसी, खाण तू धैर्य जिद्दीची,
साता समुद्रापारही फडकली, निशाणे अतुल प्रतिभेची,
झुगारले ऐश्वर्य सकळ, करिण्या सेवा मायभूची,
ललनांची प्रेरणा तू, अस्मिता अनुपम राष्ट्राची।
रुख्माबाई राऊत यांचा वाढदिवस
(Rukhmabai Raut is best known for being one of the first practicing women doctors in colonial India as well as being involved in a landmark legal case involving her marriage as a child bride.)
*****

No comments: