15 August, 2019

• स्वतंत्र

असत्य फोफावले वावरात, सत्य उकिरड्यावर नासले,
भयभीत रम्य बालपण, केवळ जाहिरातीत हसले,
बीभत्स नागव्या लीलांनी, शील प्रत्येक चिरडले,
अनागोंदीच्या ज्वाळांंत, उपवन होरपळून गेले।

उल्लास का करावा, श्वास जे कोंडती फुलांचे,
पदन्यास गुलाम झाले, बेबंदशाहीच्या बेड्यांचे,
सुज्ञ शहारले ऐकून, पडसाद अराजकतेचे,
प्राण कंठाशी आले, स्वतंत्र बालगुलाबाचे।
*****
# Independence, Freedom

No comments: