A collection of promotional pages of my poetry books, poems, stories, articles and shayari
26 October, 2016
25 October, 2016
• स्पेक्ट्रम
माझ्या लहानपणी आई घराच्या अंगणातच
भाजीपाल्याची लागवड करायची. बऱ्याचदा भाजी तोडून आणण्याचे काम ती माझ्यावर सोपवीत असे.
मी देखील आनंदाने मातीत खेळण्याची ती संधी घालवीत नसे. “कोवळी-कोवळी पाने खुडायची,
बरं का ....” माझ्या हाती टोपली देत आई सांगत असे. कोरड्या लाल मिरच्या घालून केलेल्या
चवळीच्या खरपूस भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. तव्यावरून नुकत्याच काढलेल्या चपातीबरोबर
ती खाण्याच्या स्वर्गीय सुखात, भाजी खुडताना झालेल्या बोटांच्या करड्या टोकांचा लगेच
विसर पडायचा. एकेक वर्ग पुढे जात विज्ञान शिकत गेलो, तसे-तसे सृष्टीचे रहस्य उमगू
लागले. मनुष्य आणि प्राण्यांमध्ये असते तसलेच काहीसे जाळे वृक्षवल्लींच्या अंतरंगात
असते, आणि त्यावाटे विविध द्रव्यांच्या सहाय्याने पोषक तत्त्वांचे वहन होऊन पाने, फुले,
फळे बहरतात हे जाणून सुखद विस्मय झाला. माझ्या
एका शालेय पाठ्यपुस्तकात जगदीशचंद्र बोसांवर आधारीत धडा होता. वृक्षवल्लींनाही भावना
असतात आणि यातना होतात हे विविध यंत्रांच्या सहाय्याने बर्याच वर्षांपूर्वी त्यांनी
सिद्ध करून दाखविले होते. जगभर मान्यता प्राप्त झालेले ते संशोधन वाचले आणि भाजी खुडताना
झालेल्या बोटांच्या करड्या टोकांचे कोडेही उलगडले. “अंधार पडल्यानंतर पाना-फुलांना
हात लावून त्रास देऊ नये, निजलेली असतात ती” लहानपणी खोटे-खोटे वाटणारे हे आजीचे शब्द
खरे वाटू लागले. त्यापुढील वर्गांमध्ये मानवी कान व डोळे एका विशिष्ट वेवलेंग्थ च्या
अलीकडे आणि पलीकडे ऐकू व बघू शकत नाही हे गुपितही कळले. भाजीची पाने खुडणे असो अथवा
कीट-नाशकांच्या मदतीने किड्या-मुंग्यांचा जाच कमी करणे; केवळ जे लाल वाहील तेच रक्त
आणि ऐकू येते तीच किंकाळी ह्या संकल्पना मोडीत निघाल्या. निव्वळ प्राणीहत्या म्हणजेच
जीवहत्या आणि पाप ह्या व्याख्या अपुर्या वाटू लागल्या.
वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार
केल्यास, वास्तविक कुठल्याही सजीवाला स्वतःच्या अस्तित्वासाठी सजीव वस्तूंवरच अवलंबून
राहवे लागते. सजीव वस्तूंची भविष्यातील दुर्मिळता हेरून, बुद्धीच्या जोरावर आणि विज्ञानाचा
सदुपयोग करून मानवाने सजीवाला निर्जीव पर्याय देखील शोधले. पण खाद्यसामुग्री, वस्त्रे,
पादत्राणे, इतर दैनंदीन गरजेच्या वस्तू, इतकेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात देखील काही
वनस्पतीजन्य वस्तूंना आजवर पर्याय लाभलेच नाहीत. काहींना आहेत परंतु गैरसोयीचे अथवा
अपुरे. हेच विधान प्राण्यांपासून निर्मित वस्तूंसाठी देखील लागू पडते. मुद्दा पाप-पुण्याचा
नसून मानवी अस्तित्वासाठीच्या सोयींचा, प्रगतीकरिता असलेल्या संघर्षाचा आणि मानवाच्या
जाणीवेच्या अपुर्या क्षमतेचा आहे. सृष्टीवर विजय मिळवून मानवाने स्वतःचे अस्तित्व
टिकविले. प्रगतीच्या त्याच्या संघर्षात सजीवाची आहुती अपरिहार्यच ठरली. सृष्टीच्या
प्रत्येक घटकाच्या अतुलनीयतेची कधी जाणीवच नव्हती असे नव्हे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’
सारख्या रचना वाचून-ऐकूनच मानव लहानाचा मोठा झाला. पण जीवनाच्या रणधुमाळीत ह्या शब्दांचे
सार ग्रहण करावयाचे राहून गेले. ‘वदनी कवळ घेता’ सारखी सुवचने वदूनच एके काळी आपल्याकडे
प्रत्येक भोजनाची सुरुवात होत असे. अन्नाचा एकही कण वाया जाऊ न देता पान स्वच्छ करून
श्लोक आचरणात आणावा लागत असे. अन्नाची महती सांगणारे ह्यासारखे श्लोक काळाच्या ओघात
मोजक्याच प्रसंगी म्हणू जाऊ लागले आणि अन्नाच्या पूर्णब्रह्मत्वाची उजळणी न झाल्याने
‘लेफ्ट ओव्हर’ चे ढिगारे उंची गाठू लागले. एका ठराविक वेवलेंग्थच्या घेर्यातच
ऐकू व बघू शकणार्या मानवाने प्राणीहत्येलाच अधिक संवेदनशील मानले. एक्सप्रेस हाय-वे
सारख्या अत्याधुनिक सोयींसाठी मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड असो अथवा लहान
रेस्टॉरंट ते धनदांडग्यांच्या ‘बिग फॅट वेडिंग’ मध्ये होणारी अन्नाची नासाडी; दोन्ही
बाबी प्राणीहत्येइतक्याच क्लेशदायक व संवेदनशील, पण जीवहत्येच्या रूढ व्याख्येत स्थान
न मिळालेल्या. दृष्टीआड सृष्टी असते. दैनंदीन वापरातल्या वस्तूंच्या निर्मितीत किती
आणि कुठल्या सजीवांचे बळी गेले, ह्याची जराही जाणीव न ठेवता आपण त्यांचा वापर तर करीतच राहतो.
वैद्यकीय अभ्यासक्रमात मानवी शरीराची
अतिशय सुरेख, नीटनेटकी आणि प्रतिकृती निर्माण करण्यास अशक्य असलेली अद्भुत रचना शिकून सृष्टी किती अफाट आणि अगम्य आहे याची प्रचीति आली. मानवाच्या असंख्य भावना, जाणीवा
व त्याच्या असामान्य कल्पनाशक्तीशीही परिचय झाला. परंतु त्याचबरोबर त्याच्या
कमतरताही उमजल्या आणि मानव त्याच्या मेंदूचा काही भाग उपयोगात आणतच नसल्याचेही कळले.
असेच एका तासाला अल्ट्रासाऊंड, एक्स-रे, इन्फ्रारेड लहरींसोबत इतर तरंगांबद्दलही माहिती
मिळाली. “........ बिकॉज दीज आर बियाँड युअर ऑडिबल अँड व्हिजिबल स्पेक्ट्रम.” खणखणीत
स्वरात सरांनी सांगीतले आणि स्पेक्ट्रमच्या मर्यादेतच ऐकू-बघू शकणार्या मानवाच्या
संवेदनशीलतेचे व जाणीवेच्या कुवतीचे भौतिक अपुरेपण प्रकर्षाने जाणवले. ह्यातले भौतिकशास्त्र
क्षणभर बाजूला सारून वेगळ्या अनुषंगाने विचार केला असता वाटते कि खरच, व्यक्तिगत जीवनातदेखील
एका विशिष्ट स्पेक्ट्रम च्या अलीकडे व पलीकडे, आपल्याला ऐकू येत नाही, दिसत नाही,
आणि जाणवत तर अजिबात नाही!
*****
22 October, 2016
'विदा'
दोनों तरफ़ के बेबस हालात देख लगा, कि शख़्स और
वजह की गुफ़्तगू लाज़िम है। इत्तिफ़ाक़न् एक रोज़ उनकी रू-ब-रू हो ही गई।
शख़्स ने वजह को देखते ही कहा-
ढूँढ़ ही लेता है मुझे बड़ी आसानी से,
दर्द वाक़िफ़ हो गया है मेरे हर ठिकाने से.
वजह ने कहा-
माना, कि हमारी बेरुख़ी में बहुत शिद्दत थी,
ख़फ़गी बयाँ करते तो गुमराह न होते.
शख़्स ने कहा-
कैसे उम्मीद रखते दरारों में झाँकने की,
खुला दरवाज़ा भी आपने किया अनदेखा.
वजह ने कहा-
चुप्पी हमारी क़ाबिलीयत सी बन गई थी,
ख़ामोशी का हुनर आप ही से सीखा था.
शख़्स ने कहा-
हमें बदल दिया आपने आपके हुनर से,
अब तो अक्स भी ग़ैर लगता है.
वजह ने कहा-
पुराने कभी बदले ही नहीं,
वरना इश्क़ भी नई शिद्दत से करते.
वरना इश्क़ भी नई शिद्दत से करते.
शख़्स ने कहा-
हमने तराइक़ बदले आपके अंदाज़-ए-बयाँ के मुताबिक़,
ठोकरें खाईं हमने मगर, नाज़ आपको अंदाज़-ए-बेरुख़ी
का था.
वजह ने कहा-
हमारी बेरुख़ी से भी ज़्यादा आपके अंदाज़ बेदर्द
थे,
निशाँ देखकर भी पूछा, इंतिहा-ए-तक्लीफ़ क्यों है.
शख़्स ने कहा-
मिल्कियत समझ बैठे आपको, यही तक्लीफ़ थी हमारी,
ख़ुद लुटकर आपकी जफ़ा जो कमाई थी हमने.
वजह ने कहा-
ग़म यही है, कि हमपर जफ़ा का बस था,
तबाही रोक न सके दुतर्फ़ा, क़फ़स बड़ा बेरहम था.
एक लंबी ख़ामोशी के बाद शख़्स और वजह ने एक दूसरे
से ख़ामोशी से ही विदा ली, मगर विदा लेते वक़्त दोनों के दिलों में सुकून था। शायद इसलिए, कि-
माना, कि हसीन यादें रोशन करती हैं ज़िंदगी,
सूखे पत्तों की सरसराहट भी नायाब नग़्मात सुनाती
है.
(वाक़िफ़-aware, बेरुख़ी-ignorance, शिद्दत-intensity, ख़फ़गी-resentment, गुमराह-lost way, दरार-defect, क़ाबिलीयत-ability, हुनर-skill, अक्स-reflection, ग़ैर-unfamiliar, अंदाज़-ए-बयाँ-way
of submission, नाज़-pride, अंदाज़-ए-बेरुख़ी-way
of ignorance, बेदर्द-rude, निशाँ-scars, इंतिहा-ए-तक्लीफ़-limit of
sorrow, मिल्कियत-earning, जफ़ा-extreme
rudeness, तबाही-destruction, दुतर्फ़ा-bilateral, नायाब-unique)
*****
'अश्क'
वजह का मरज़ जानकर महसूस हुआ, कि तक्लीफ़ दोनों को है। शख़्स ने उसकी तक्लीफ़ अब तक सरे आम बयाँ नहीं की थी, और वजह ने पहली बार
ही ज़िक्र किया था। बड़ा मुश्किल था पहचानना, कि किसे ज़्यादा दर्द है। मेरी बेचैनी जान
वजह ने ख़ुद ही कहा-
यूँ तो किसीके अश्क-ओ-ग़म किसीसे कम नहीं होते,
उनके बहें तो सैलाब, हमारे बहें तो क़ियामत ही
आ जाए.
(अश्क-ओ-ग़म-tears & grief, सैलाब-flood, क़ियामत-doom)
*****
'मरज़'
उस शख़्स की ‘ज़िंदा’दिली देख उसपर फ़ख़्र हुआ। सोचा, कि उसके रंगे हुए दिल की तस्वीर
से वजह की रू-ब-रू कराऊँ; लेकिन मुलाक़ात हुई तो जाना, कि जिसे किसीके दर्द की वजह बनने
में कभी ख़ुशी महसूस हुई थी, वह ख़ुद ही आज मायूस है। मैंने वजह से पूछा, “बात क्या है?”
वजह ने कहा-
यह ग़म नहीं, कि हम कभी न बन सके उनके,
वह बने ही हैं हमारे अबतक, यही बेरहम मरज़ है.
(ग़म-grief, बेरहम-ruthless, मरज़-ailment)
*****
21 October, 2016
20 October, 2016
'उल्फ़त'
बेदर्दी अपनी शिद्दत से उल्फ़त को नातवाँ तो कर देती है, मगर उल्फ़त बेदर्दी को झुकाने की क़ाबिल भी होती है। बेदर्दी नादान होती है, उल्फ़त को काग़ज़ात में खोजती है। इस सच से अनजान और बेख़बर, कि उल्फ़त इतनी बेबस नहीं
होती, कि चीज़ों में क़ैद हो सके।
उल्फ़त ख़ामोश होती है, उसका कलाम
नहीं बनता,
तिलिस्म-ए-रिश्ता बयाँ करता है, बेज़ुबान एहसासात की नज़्म.
(उल्फ़त-love, बेदर्दी-rudeness, शिद्दत-intensity, नातवाँ-weak, कलाम-note, तिलिस्म-ए-रिश्ता-magic of relation, नज़्म-poem, बेज़ुबान-mute)
*****
19 October, 2016
'साथ'
जिसने दर्द न छिपाने की वजह कही थी, उस शख़्स से कल दोबारा मुलाक़ात हुई। उसने
ख़ुद को दर्द से पहले जितनाही बेख़बर रखा था। जब इश्क़ के खोने का उसे ख़ास
अफ़सोस न होने की वजह जानना चाही, तो जुदाई को दिल से न लगाने की वजह उसने कुछ यूँ कही-
मुहब्बत देती है साथ फ़ना होने तक,
यादें लिपटती हैं रूह के बस आख़िरी आह तक,
कौन देता है साथ यहाँ, कितना, कहाँ तक,
देखा है कभी साँसों को दफ़न होते अब तक?
(फ़ना-destroyed, रूह-soul, आह-sigh, दफ़न-bury)
*****
16 October, 2016
'बिनतारी अहेर'
“पोस्टमन .....!” अलीकडे क्वचितच कानी येणारी हाक ऐकून अगोदर काकूंनी दुर्लक्ष
केले. एरवी तो अधून-मधून येणारी पत्रे दाराखालून सरकवून निघून जात असे. पण पुन्हा एकदा
हाक ऐकू आली, तेव्हा काकू समोरच्या खोलीत आल्या. लोखंडी जाळीच्या भक्कम दारापलिकडे
काकूंना कुणी उभे असलेले दिसले. चार-पाच ठराविक प्रश्न विचारून, तो नक्की पोस्टमनच
आहे ह्याची खात्री करून घेऊन काकूंनी दार उघडले. गेल्या काही वर्षात भुरटे चोर आणि माथेफिरूंचा
हैदोस वाढला होता. ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरून लूटमार करणे आणि जरासाही विरोध दर्शविल्यास
जीवे मारण्याच्या घटना हल्ली नियमित झाल्या होत्या. त्यामुळे लोखंडी दार उघडण्यापूर्वीचे
प्रश्न ही कवायतच झाली होती. “हं .... इथे ....” एका चुरगळलेल्या कागदावर वाचताना
कुणालाही भोवळ यावी अशा गिचमिड अक्षरात लिहिलेल्या यादीतील एका नावापुढे
पोस्टमनने काकूंना सही करावयास लावले. सुरेख, रंगीबेरंगी नक्षी असलेल्या चमचमणार्या
कागदाचे वेष्टन चढवलेले ते एक पार्सल होते. पोस्टमन अजूनही रेंगाळतोय असे पाहून काकू म्हणाल्या,
“थांबा, पाणी आणते.” उन्हात फिरून दमलेला पोस्टमन पंचाने घाम पुसत दाराशेजारी असलेल्या
ओसरीवर एक लांब सुस्कारा सोडून बसला. “अकस्मात आलेल्या पाहुण्यास हातावर गोड घातल्याखेरीज
परतू देऊ नये हों ....... वत्सलें .......” वेंगुर्ल्याच्या आत्याने अनेकदा सांगितलेले
काकूंना पुन्हा एकदा आठवले, आणि वर्हाडात अपवादानेच कानी पडणारा तिचा सानुनासिक आवाज
आठवून ओठांवर स्मित ही आले. पाण्याबरोबर अनपेक्षितपणे आलेली लाडवाची वाटी पाहून पोस्टमन ओशाळला. “त्रास घेतला तुम्ही .....” पोस्टमनने वाटी आणि गडवा-पेला घेत म्हटले. कामे
बरीच शिल्लक असल्याने पोस्टमनने जरा लगबगीनेच लाडू खाल्ला आणि निरोप घेताघेता काकूंना विचारले, “इनाम देता?”
साधारण वर्षभरापूर्वी काकांच्या
खात्यात भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यापासून सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांचे पेंशन बेमुदत काळापर्यंत रोखण्यात आले होती. काकांच्या माघारी मिळणारी अर्धे पेेेन्शन
देखील तूर्तास बंद असल्यामुळे काकूंनी पोस्टमनला दहा दिवसानंतर येऊन बघण्यास सांगून
वेळ निभावून नेली. काकांची साधी नोकरी आणि एकूण परिस्थिती बेताचीच. पण नामुश्कीचा असा क्षण बघणे काकूंना कधीच अपेक्षित नव्हते. मुलाला चांगले शिक्षण घेता यावे म्हणून
सदैव काटकसरीचीच सवय, तरीदेखील किरकोळ पण आवश्यक खर्चाच्या वेळी मात्र कधीही हात आखडता घेतला
नव्हता. मुलगा गुणी असल्यामुळे त्याच्या अवांतर खर्चाला देखील कधीही आळा घातला नाही. त्यामुळे
पूर्ण स्कॉलरशीप मिळूनही त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरखर्च जपूनच करावा लागला.
परदेशातील नोकरीवर शिक्कामोर्तब झाले त्या दिवशी त्याच्या आनंदाला पारावार नव्हता.
काका-काकूंनाही त्याची तपश्चर्या फळास आलेली पाहून समाधान वाटले. अद्ययावत् सुखसोयींनी
युक्त पश्चिमी देशाच्या सुबत्तेने त्याला अपेक्षेप्रमाणे भुरळ घातली. हळूहळू मायदेशाविषयीचा
तिटकारा वाढू लागला. शहरात वाढलेल्या मुलाची ही स्थिति, तर तालुक्यात वाढलेल्या
सुनेला तिकडल्या ऐश्वर्याने भुरळ घातली नसती तरच नवल होते. स्वतःच्याच मातीचा
गंध दोघांनाही नकोसा होऊ लागला. सुरुवातीला वर्षातून दोन वेळा होणारी मायदेशाची वारी
दोन वर्षात एकदा होऊ लागली. नियमितपणे येणारी पत्रे आधी वरचेवर आणि पश्चात् एखाद्या
वेळीच येऊ लागली. लिहिणे कष्टाचे आणि फोन सोयीचा वाटू लागला. एरवी खंबीर वाटणारे काका-काकू मुलाच्या झपाट्याने बदललेल्या स्वभावामुळे खजिल झाले.
विजेची आणि पाण्याची बिले भरण्याच्या रांगेत ताटकळत उभे राहणे, अर्धे पेन्शन लागू होईपर्यंत जवळजवळ वर्षभर काकांच्या कचेरीचे उंबरठे झिजवणे, चोरीच्या भीतीने दर खेपेला अगदी मोजकीच रक्कम काढण्यासाठी वारंवार बँकेच्या वार्या करणे, ह्या आणि काकांच्या माघारी ओघाओघाने आलेल्या अशा नाना जबाबदार्या पार पाडतापाडता काकूंना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू लागला. एकदा त्यांच्या आजारपणामुळे विजेचे बिल भरण्याची शेजारच्याला विनंती करण्याचे निमित्त झाले आणि उत्तर भारतातून उपजीविकेच्या शोधार्थ विदर्भात आलेला जगदीश घरचाच होऊन गेला. त्याचे मराठमोळ्या जेवणाचे वेड पाहून त्याची पत्नीदेखील काकूंकडून मराठी पाककलेचे धडे घेऊ लागली. एकदा जगदीशच्या सासूबाई सणासुदीला पाहुणी म्हणून आल्या असता, नातवाच्या पानात तुपातल्या पराठ्यांऐवजी साजूक तूप घातलेले साधे वरण चपाती बघून चाटच पडल्या. कोकणातून विदर्भात आलेल्या काकूंनाही वर्हाडी खाद्यपदार्थांची आवड अगदी नकळत आणि मोजक्याच कालावधीत जडली होती. बर्याच वर्षांपूर्वी एकदा काकूंकडे दिवाळीस म्हणून त्यांची आत्या आली, तेव्हा गोळा-भाताचा बेत होता. कढवलेले तेल भातावर घालून आत्याने पहिला घास घेतला आणि चिंचेचे सार फुर्र करून पिताना ठसकाच लागला. “अगदी थेट वर्हाडी झालीस गों .... वत्सलें .....” आत्याने ठसक्यातून सावरून म्हटले आणि खो खो करीत पुन्हा ठसका लागेपर्यंत मनमुराद हसली.
विजेची आणि पाण्याची बिले भरण्याच्या रांगेत ताटकळत उभे राहणे, अर्धे पेन्शन लागू होईपर्यंत जवळजवळ वर्षभर काकांच्या कचेरीचे उंबरठे झिजवणे, चोरीच्या भीतीने दर खेपेला अगदी मोजकीच रक्कम काढण्यासाठी वारंवार बँकेच्या वार्या करणे, ह्या आणि काकांच्या माघारी ओघाओघाने आलेल्या अशा नाना जबाबदार्या पार पाडतापाडता काकूंना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू लागला. एकदा त्यांच्या आजारपणामुळे विजेचे बिल भरण्याची शेजारच्याला विनंती करण्याचे निमित्त झाले आणि उत्तर भारतातून उपजीविकेच्या शोधार्थ विदर्भात आलेला जगदीश घरचाच होऊन गेला. त्याचे मराठमोळ्या जेवणाचे वेड पाहून त्याची पत्नीदेखील काकूंकडून मराठी पाककलेचे धडे घेऊ लागली. एकदा जगदीशच्या सासूबाई सणासुदीला पाहुणी म्हणून आल्या असता, नातवाच्या पानात तुपातल्या पराठ्यांऐवजी साजूक तूप घातलेले साधे वरण चपाती बघून चाटच पडल्या. कोकणातून विदर्भात आलेल्या काकूंनाही वर्हाडी खाद्यपदार्थांची आवड अगदी नकळत आणि मोजक्याच कालावधीत जडली होती. बर्याच वर्षांपूर्वी एकदा काकूंकडे दिवाळीस म्हणून त्यांची आत्या आली, तेव्हा गोळा-भाताचा बेत होता. कढवलेले तेल भातावर घालून आत्याने पहिला घास घेतला आणि चिंचेचे सार फुर्र करून पिताना ठसकाच लागला. “अगदी थेट वर्हाडी झालीस गों .... वत्सलें .....” आत्याने ठसक्यातून सावरून म्हटले आणि खो खो करीत पुन्हा ठसका लागेपर्यंत मनमुराद हसली.
दिवाणावर पडल्यापडल्या विचारात हरवून केव्हा डोळा
लागला ते काकूंना कळलेच नाही. काळोख पडायला जरासाच अवकाश होता. रोजच्या नेमानुसार काकूंनी
तुळशीशेजारी दिवा ठेवला आणि अंगणात राहून गेलेली जगदीशच्या मुलाची लहानशी तीन चाकी
सायकल घरात घेतली. त्याची अर्धी खेळणी काकूंकडेच मुक्कामास असायची. अधूनमधून त्या
मायलेकांचा देखील मुक्काम पडायचा. जगदीश कोर्ट-कचेरीच्या कामाने त्याच्या गावी एकटाच
जात असे. सुव्यवस्थेचे तिथे धिंडवडे निघाल्याचे तो सांगत असे. त्याच्या पत्नीने लग्नाच्या
वेळी त्याचे घर आणि गाव पाहिले तेवढेच. मुलाला त्याने गावी अजून नेलेच नव्हते. पण दर
खेपेस परतला की त्याच्या मूळ स्थानाविषयी भरभरून बोलायचा. मातीशी नाते तुटल्याचे दुःख
त्यास बोचत असे; पण परतण्यासारखी स्थिती तिथे उरली नव्हती. ज्यांना शक्य होते
त्यांची बिर्हाडे स्थलांतरीत झालेली आणि उरलेली नाइलाजास्तव टिकलेली. अवघ्या गडावर
सत्ता चोर-लुटारू आणि नराधमांची. “केव्हा संपणार रे बाबा हे सर्व ... पुरुषोत्तमा ....”
रात्रीचे जेवण उरकून ओटा-गॅस पुसतापुसता काकू पुटपुटल्या. निजायला अवकाश असल्यामुळे
पुन्हा समोरच्या खोलीत आल्या. बराच वेळ विचार केल्यानंतर, मनातली सगळी खिन्नता बाजूला
सारून आणि निराशा झटकून काकूंनी पार्सल उघडले. दिवाळीचा अहेर म्हणून मुलाने कॉर्डलेस
फोन पाठवला होता. चमकदार कागदात गुंडाळलेले मातृप्रेमाचे पोस्त! गत अनेक वर्षांत
मनाच्या तारा एकेक करीत तुटत गेल्या होत्या. नकळतच, पण किती समर्पक अहेर मिळाला
होता; बिन‘तारी’ बोलू शकणार्या गोजिरवाण्या खेळण्याचा!
*****
14 October, 2016
'कह दो उन्हें'
जुदाई यक़ीनन् रंजीदगी देती है। मगर इसे सहने वालों
को इस दर्द की अजीब चाहत होती है। उँगली में काँटा चुभ जाए, तब भी दर्द कई दिनों तक
बरक़रार रहता है। अरसे तक जुदाई सहने वालों को दर्द बरदाश्त करने का हुनर जाने कहाँ
से हासिल होता है। अकसर ख़ामोश रहकर सहने वाले ऐसे लोगों में, कुछ सरे आम बयाँ करने
वाले भी मिल जाते हैं। ऐसेही एक शख़्स ने दर्द न छिपाने की वजह कुछ यों कही-
न ढँको यूँ तपिश को,
सेंक भी तो लेते हैं नफ़स,
फफोले न छिपाना, उन्हें
देख ही कोई खोल दे क़फ़स,
शोले दिखाने में क्यों
झिझक, शायद रोशन करेंगे तमस्,
बनकर ख़ाक उड़ना आसाँ
कहाँ, कह दो उन्हें नहीं हम बेबस.
(तपिश-distress, नफ़स-breath, क़फ़स-cage, तमस्-darkness)
*****
11 October, 2016
'पुस्तकातला ऑटम'
“आऽऽऽच्छी ....!” माझा मित्र फोनवर
बोलता बोलता शिंकला, आणि ‘तिकडल्या’ हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे सांगितले. परदेश-वारी
प्रत्यक्ष करण्याचा योग आला नसला, तरीही चित्रपट, वर्तमानपत्र, कथा-कादंबर्या आणि
हल्लीच्या फेसबुक-व्हॉट्सॲप आंदोलनामुळे पाश्चात्त्य देशांचे एक विशिष्ट चित्र मनावर
आपोआप रेखाटले गेले आहे. स्वच्छ, सुंदर, सुबक, मोहक, देखणे, मनोरम अशी अनेक विशेषणे
लावता येतील असे एकाहून एक सरस देश. शाळेत असताना पाश्चात्त्य लेखक आणि कवींनी बालमनात
जे चित्र भरले, ते फोटोंच्या माध्यमातून खरेच वाटू लागले. “विस्तीर्ण बाग, बागेतले मऊसर
हिरवेगार लॉन, सर्वदूर पसरलेली रंगीबेरंगी पानगळ, एका पार्क-बेंचवर रेलून बसलेला, मानेपर्यंत
रुळलेल्या केसांशी उगीच चाळा करणारा रांगडा तरूण, पलीकडच्या कोपर्यात असलेल्या
बेंचवर वॉकिंग-स्टिकच्या मुठीवर स्वतःची मूठ आणि हनुवटी टेकवून शून्यात बघणारा साठीतला
एकटा, दगडी पायवाटेवर विखुरलेली कोरडी पाने आपल्या गुडघ्यापर्यंतच्या गमबुटांनी निर्दयतेने
चुरगाळून पुढेच पुढे जाणारी देखणी, आणि त्या पानांच्या करकरण्याने कान टवकारून लडिवाळपणे
भू करणारा रुबाबदार जर्मन शेपर्ड, असे सगळे बघण्यात काय मजा येत असेल रे” ह्या माझ्या
भाबड्या बोलण्यावर तो म्हणाला, “अरे कोणता पार्क आणि कसले गवंत?” त्याच्या मते पार्क-बेंचवर
बसू देण्याइतकी तिकडली थंडी काही रमणीय वगैरे नसते. शेक्सपिअर ते टॉलस्टॉय आणि वर्डस्वर्थ
ते फ्रॉस्ट पर्यंत सगळ्यांना माझ्या मित्राने एका झटक्यात खोटारडे ठरवून टाकले
होते. नवल म्हणजे ह्याच मित्राला भारतातला ग्रीष्माअंती येणारा पहिला पाऊस मात्र केवढा
आवडायचा; नव्हे, अजूनही आवडतो. आता मी त्यास माझी पावसातली त्रेधा तपशीलवार सांगीतली,
तर पाडगावकर-माडगूळकर मंडळी त्याला खोटी वाटावयास लागतील.
कामाच्या व्यापात, जबाबदार्यांच्या गराड्यात बहुधा त्या थंडीचा त्रास त्याला
प्रकर्षाने जाणवत असावा. दुरून डोंगर साजरे असतात. न राहवून मला शालेय जीवनात वाचलेली
‘दि लिटिल मॅच गर्ल’ आठवली. आगपेटीतल्या प्रत्येक पेटत्या काडीच्या प्रकाशात दर वेळी
सुरेख स्वप्नात हरविणारी चिमुरडी, शेवटची काडी विझताच जीवघेण्या थंडीत जीव टाकते. प्रेमात
पडण्याच्या नाजुक वयात ती शोकांतिका वाचून सर्वांगावर आलेले शहारे आजही स्मरतात. प्रमाणाबाहेरची
बर्फवृष्टी, निसरडे रस्ते, त्यामुळे होणारे अपघात, फ्लू ची भयंकर साथ, अंगभर घालाव्या
लागणार्या जाड्याभरड्या कपड्यांमुळे होणारी अस्वस्थता ह्या सर्वांची झळ जावे त्यांच्या
देशा तेव्हाच कळे. जी अवस्था माझी, तीच त्याची. त्याला इकडच्या ऋतूंचे अतोनात वेड. परंतु भारतातदेखील विविध ऋतूंमध्ये नाना कारणांनी त्रास होतोच. गेली कित्येक वर्षे
तिकडे वास्तव्यास असल्यामुळे इकडल्या त्रासाची बहुधा त्यास जाणीव नसावी.
पण हा ऋतूंमधील त्रास नाण्याची एकच बाजू सांगतात. ही बाजू जेवढी जाचक वाटते,
तेवढीच दुसरी बाजू रमणीय आणि आल्हाददायक असते. जीवघेण्या थंडीत कामे उरकून जेव्हा मित्र
घरी परतत असेल, तेव्हा फायरप्लेससमोर पाय मोकळे सोडून, वाफाळलेल्या, फेसाळलेल्या गरम
कॉफीचे घोट घेताना जे समाधान तो अनुभवत असेल, तसलेच काहीसे आपणही पावसात चिंब भिजून,
घरी परतून, कढत पाण्याचे स्नान उरकून, आल्याचा चहा पिताना अनुभवतो. कॉफीचा आस्वाद
घेता घेता खिडकीबाहेरच्या पार्कचा मघाचा शुष्क देखावा त्यालाही तेवढाच रम्य वाटत असेल,
जेवढा खिडकीबाहेरचा धो-धो पाऊस आपल्याला सुखावतो. बोचणारी बाजू पाहिल्याखेरीज मखमली
बाजूचे महत्त्व आणि अस्तित्व पटत नसावे. नाण्याच्या ह्या सुखद बाजूचे बरेचसे श्रेय
लेखणीबहाद्दरांनाच द्यावे लागेल. आपल्या नकळत आपण बालपणी आणि ऐन तारुण्यात वाचलेले
शब्द प्रत्यक्षात जगत असतो. त्या शब्दांत स्वतःला ठेवून एका रम्य विश्वात रमत जातो.
सांसारिक आणि व्यावहारिक गुंतागुंतीत
अडकून बर्याचदा आपण ऋतूंमध्ये गंमत देखील असते, हे मुळी विसरूनच जातो. अशा वेळी पूर्वी
वाचलेले साहित्य आठवून जखमांवर फुंकर घातल्यागत वाटते. ऋतू असोत अथवा जीवनातील विभिन्न
अवस्था, प्रत्येक परिस्थितीत लेखक वा कवी स्वतःला तर चपखलपणे बसविण्यात तरबेज असतातच; पण वाचकाला देखील एका वेगळ्याच, काल्पनिक पण वास्तव वाटणार्या अवस्थेत सहज घेऊन जातात.
त्यांच्या ओळी कल्पनाविलास, अतिशयोयोक्ती देखील असतील; पण रोजच्या रहाटगाडग्यातून काही काळ
बाहेर निघून, मोजके क्षण स्वप्नात हरवू देऊन, पुन्हा त्याच किंवा त्याहूनही अधिक कष्टांना
सामोरे जाण्याचे सामर्थ्य मात्र नक्कीच देतात. किंबहुना त्यांचे शब्द वास्तव धरले
तर अगदी काही क्षणांपूर्वीपर्यंत नकोसे वाटणारे पावसातले डबके, छपक-छपक करण्याची
लालूच दाखविल्याखेरीज राहत नाही.
*****
'विजया-दशमी'
अब न क्षमा,
न देंगे अवसर, भस्म करने हैं अधम,
करने हैं आतंकी कायरों के नापाक सिर क़लम,
आया है क्षण सीमोल्लंघन का, हर दिशा, हर क़दम,
लाँघ मर्यादा अब रेखा की, बनें वे वीर पुरुषोत्तम।
मातृभूमि शक्ति
बन अब, हो भ्रष्टासुरमर्दिनी,
हो पांडव पंच-भूत सकल भद्र के, बरसें बन दामिनी,
कंपित गलित-गात्र हो शत्रु, दे स्वयम् को मुखाग्नि,
हर लाल कौत्स हो गाए, स्वर्णिम विजय-रागिनी।
विजया-दशमी की हार्दिक बधाई।
*****
Subscribe to:
Posts (Atom)